हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

फिल्मी पण सत्य घटना

By- Paresh Chitnis

सत्य हे काल्पनेपेक्षा आश्चर्यकारक असतं असं म्हणतात. अशीच एक घटना घडली ज्यामुळे फिंगरप्रिंटींग अनिवार्य करावे लागले.

बोटांचे ठसे घेण्याची पद्धत अवलंबण्यात येण्याआधीची ही घटना आहे. १८८७ पासून अल्फान्स बर्टीलोन या फ्रेंच हस्ताक्षर तज्ञ यांनी तयार केलेल्या पद्धती प्रमाणे तुरुंगातील सर्व गुन्हेगारांचे प्रोफाईल बनवले जायचे. त्यात ओळख पटण्यासाठी प्रत्येकाचे समोरून व बाजूने फोटो काढले जात. उंची, बुटांचे माप, कपाळाचा घेर इत्यादी मोजून नोंदवले जात असे.

१९०३ मध्ये कंसास येथे एके दिवशी एका विल वेस्ट नवाच्या गुन्हेगाराला किरकोळ गुन्ह्यासाठी तुरुंगात टाकण्यासाठी आणले असता एम. डब्ल्यू. मॅक्लाॅगरी नावाच्या कारकुनाने त्याला नाव विचारले व आधी कधी तुरुंगात शिक्षा भोगली होती का असे विचारले. कारण त्या परिस्थिती त्याची फाईल आधीच तयार असेल. मात्र तो म्हणला की त्याने पहिल्यांदाच किरकोळ गुन्हा केला आहे.  मॅक्लाॅगरी अनुभवी कारकून होता आणि जुने गुन्हेगार ही असच खोट बोलतात म्हणुन त्याने जुन्या फाईल तपासल्या तर त्याला विल्यम वेस्ट नावाची फाईल सापडली. 

"तू खोटं बोलतोयस. तुझ्या नावाची तर फाईल आधीच आहे. पायाच्या बूटांचे माप, डोक्याचा घेर, उंची, रंग, फोटो सगळच तर बरोबर आहे." असे तो विल वेस्टला बोलला. पण त्याला फाईल मध्ये हे वाचून आश्चर्याचा धक्काच बसला की ही फाईल तर 2 वर्षांपूर्वी १९०१ मध्ये तयार झाली आहे आणि विल्यम वेस्ट हा खुनाच्या गंभीर गुन्ह्यासाठी दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. 

मग हा समोर उभा असलेला कोण? मॅक्लाॅगरी त्वरित तुरुंगात गेला आणि त्याला जगातील दुर्मिळ दृश्य बघायला मिळालं. विल्यम वेस्ट नावाचा अट्टल गुन्हेगार तुरुंगात होता आणि विल वेस्ट नावाचा हुबेहुब तसाच दिसणारा, शरीराची सगळी मापं सारखी असलेला किरकोळ गुन्हेगार त्याच तुरुंगात दाखल झाला होता. 

या घटनेनंतर ओळख पटवीण्याचा बर्टीलोन पद्धत अपुरी आहे असे घोषित करण्यात आले व बोटांचे ठसे अनिवार्य करण्यात आले. 

ही घटना इतकी रंजक होती की लोकांनी पुढे या कथेला कल्पनेची जोड दिली. विल्यम वेस्ट आणि विल वेस्ट हे लहान पाणी विलग झालेले जुळे भाऊ असून कर्म त्यांना एकत्र घेऊन आले. मात्र असे काहीच नसून हा एक योगा योग होता. सारख्या नावाचे सारखे दिसणारे सारख्या बांध्याचे दोन व्यक्ति एकाच ठिकाणी सारख्या कारणास्तव येणं हा निव्वळ योगायोग आहे हे आपल्याला मान्यच होऊ शकत नाही. बोटांचे ठसे हेच दोन व्यक्तींना ओळखण्याचे प्रमाण १९०३ साली मान्य करण्यात आले. आईच्या पोटात एकाच बिजातून निर्माण झालेल्या दोन जुळ्या व्यक्तिंचे बोटांचे ठसे देखील वेगवेगळे असतात. फ्रान्सिस गॅलटन यांनी त्यांच्या शोधपत्रात असे मांडले आहे की ६४० लाखात २ व्यक्तींचे फिंगरप्रिंट सारखे असू शकतात. 

पुढील लेखात मी अजून एक अशीच सत्य घटना तुमच्यासाठी लिहिणार आहे ज्यात दोन व्यक्तींचे बोटांचे ठसे सारखे होते. आपल्याला हे लेख कसे वाटतात व काय वाचायला आवडेल त्याबद्दल  मला नक्की कळवा.

CPAG

Popular Posts