हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

अदृश्य अक्षरे

By- Paresh Chitnis

  रंगझेब अहेमद नावाचा 32 वर्षे वयाचा अल कायदाचा आतंकवादी जेव्हा ब्रिटन मध्ये पकडला गेला तेव्हा त्याच्या कडे तीन डायर्‍या सापडल्या. कोणताही मजकूर संशयास्पद नव्हता. 

 मात्र, त्यामधील काही पानं मध्येच कोरी होती. शोधकर्त्यांना हे वगळं वाटलं. तपास केल्यावर असे लक्ष्यात आले की त्या कोऱ्या कागदांवर अदृश्य होणार्‍या शाईने काही तरी लिहिले होते. अदृश्य शाईने लिहिलेला मजकूर वाचण्यासाठी काही प्रक्रिया करावी लागते. ती केल्यावर, त्यामध्ये आतंकवादी संघटनांसाठी महत्त्वाची ठरेल अशी माहिती सापडली.

 अदृश्य होणारी शाई ही संकल्पना काही नवीन नाही. सी आय ए ही गुप्तचर संस्था स्वतः अशा प्रकारे गुप्त माहिती ठेवत असे.

 पाहिल्या महायुद्धात जर्मनीचे ब्रिटन मध्ये पेरलेले अमेरीकन गुप्तहेरअशा प्रकारे संपर्क साधत असत. जॉर्ज वाॅक्स बेकन हा अमेरिकी पत्रकार म्हणुन काम करणारा जर्मनी साठी हेरगिरी करत असे. ब्रिटन मधून अमेरिकेत पत्रव्यवहार करत असताना तो अदृश्य शाई वापरत असे. महायुद्धाच्या काळात पत्रव्यवहारावर कडक नजर असे. त्याला कम्युनिकेशन सेनसोरशिप अस म्हंटलं जात. बेकन जी शाई वापरायचा ती लिहायला कशी वापरायची हे त्याला माहीत होते मात्र ती वाचण्यासाठी काय करावे लागते हे त्याला सुद्धा माहित नव्हते.

 फ्रांस व ब्रिटन यांना हे कमालीच कोडं होतं. अदृश्य शाई या विषयी जर्मनी व फ्रांस या देशांमध्ये जणू लढाई सुरू होती.

 लिंबाच्या रसाने लिहिलेले पत्र मेणबत्तीवर धरताच स्पष्ट दिसू लागते. रासायनिक पदार्थ वापरुन शाई गायब केली जाऊ शकते व परत दृश्य केली जाऊ शकते. स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञान वापरून अदृश्य शाई शोधली जाऊ शकते.

  जॉर्ज बेकन व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली मात्र त्याच्या ज्ञानाकडे बघता त्याला मृत्युदंडाऐवजी एक वर्ष कारावास अशी शिक्षा झाली. 

 

आज बाजारात अदृश्य होणार्‍या शाईचे पेन उपलब्ध आहेत. थर्मोलबाईल, म्हणजे उष्णतेने बदलणारे हे रासायन असते. दिसणारी शाई घर्षणामुळे अदृश्य होते. मात्र ती यूव्ही लाइट मध्ये दिसते. 

चेक वर अशा शाईने सही करून मग ती गायब केली जाते. अशे अनेक प्रकार आजकाल बघायला मिळतात. अशावेळी तज्ञ आपल्याला अदृश्य पुरावे शोधायला मदत करू शकतात. 

 

CPAG

Popular Posts